अभिनव पब्लिक स्कूल मध्ये महिला दिन उत्साहात साजरा
सांगोला गौरव न्युज नेटवर्क:
अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महिला दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध व्याख्यात्या मा. सुवर्णा इंगोले मॅडम, अजनाळे गावच्या सरपंच मा.दिपाली लाडे , उपसरपंच मा. तेजस्विनी चव्हाण, मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे यांनी केले. आणि त्यानंतरचे मा. सुवर्णा इंगोले मॅडम यांचे आनंदाचे डोही आनंद तरंग हे सुंदर व्याख्यान म्हणजे उपस्थित महिलांसाठी आनंदाची पर्वणीच ठरली.यावेळी विविध कर्तृत्ववान महिलांच्या भूमिका साकारत मुलींनी आकर्षक वेशभूषा सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. महिला दिनानिमित्त सर्व माता पालकांसाठी मदर कीड टॅलेंट शो ही स्पर्धा त्याचबरोबर विविध फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. सर्व माता पालकांनी या स्पर्धांचा मनमुराद आनंद घेतला.
या विविध स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे
मदर कीड टॅलेंट शो -
शौर्य,रियांशी व सोनाली धर्मराज कोळवले - प्रथम
हर्षदा व मयुरी संदीप कुरे - द्वितीय
श्रुती व स्नेहल सचिन जाधव - द्वितीय
अनुष्का व पूनम धुळा शेजाळ - तृतीय
प्रथम, परिनीता व अरुणा मधुकर पुजारी - तृतीय
शिवराज व अनिता सुनील येलपले -उत्तेजनार्थ
स्ट्रॉ गेम-
आशा प्रकाश येलपले -प्रथम
ऋतुजा राहुल विभुते - द्वितीय
काजल प्रशांत लाडे - तृतीय
तळ्यात मळ्यात या स्पर्धेमध्ये
काजल प्रशांत लाडे विजेती तर
सोनाली आकाश सोळसे या उपविजेती ठरल्या.
विजेत्या सर्व महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कदम यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत