कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचे कोळे येथून प्रयाण. ..
नाझरे प्रतिनिधी
गुरु एक तूची माझा
विधाता आचल....
गुरु विना सुने सारे
विश्व हे सकल...
श्री गुरुमूर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी तिसावे मठाधिपती यांच्या आशीर्वादाने व श्री श्री श्री 108 रुद्र पशुपती कोळेकर महाराज एकतीसावे पिठाधीपती यांच्या मार्गदर्शनाखाली कोळे ते शिखर शिंगणापूर या पायी दिंडीचे कोळे येथून प्रस्थान झाले आहे.
सदर दिंडीमध्ये रुद्र पशुपती भक्त मंडळ केमवाडी, जवळा, सौ. रेखाताई शिंदे सोमेश्वर देवस्थान हातीद, वीरभद्र देवस्थान नाझरे इत्यादी दिंडी सहभागी असून, दिनांक चार एप्रिल रोजी कोळेमटातून दिंडीचे प्रयाणप्रसंगी चंद्रकांत स्वामी व सौ. निर्मला स्वामी यांच्या शुभहस्ते महाआरती व शेटफळे येथे उद्योगपती नंदकुमार जवळे व सौ. मनीषा जवळे यांच्या शुभहस्ते महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला. दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी महास्वामींचे आशीर्वचन, शिव कीर्तन व शिवपाठ तसेच शिवभक्त सौ. जयश्री शीलवंत यांचे कीर्तन होईल.
दिनांक सात एप्रिल ते नऊ एप्रिल रोजी शिंगणापूर येथे परम रहस्य ग्रंथाचे पारायण यावेळी व्यासपीठ चालक सौ. जयश्री शीलवंत राहतील. तसेच शिवभक्त दयानंद नागापल्ली व शिवभक्त हनुमंत कोरे महाराज परांडा यांचे कीर्तन व भाऊसो गोडसे यांचे भारुड होणार आहे. तरी शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोळे ग्रामस्थ व वीरशैव समाज कोळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत