लहुजी पॅंथर सेनेतर्फे सांगोला येथे मार्गदर्शन शिबिर संपन्न
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती संदर्भात लहुजी पॅंथर सेने तर्फे पंचायत समिती बचत भवन सांगोला येथे मार्गदर्शन शिबिर व अर्ज वाटप कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी उमेश चंद्र कुलकर्णी हे होते. तर अण्णाभाऊ साठे महामंडळ सोलापूर व्यवस्थापक आर. एच. चव्हाण व लेखापाल पी. एल. तेलंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लहुजी पॅंथर सेनेचा उपक्रम चांगला आहे असे सामाजिक उपक्रम राबवावेत त्यांना आमचा पाठिंबा असेल असे मत पोलीस निरीक्षक भीमराव खंनदाने यांनी यावेळी मत व्यक्त केले. तर वेगवेगळे योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवू परंतु संघटनेस सहकार्य करा असे मत लहुजी पॅंथर सेनेचे मार्गदर्शक अभिषेक भैया कांबळे यांनी व्यक्त केले.
लहुजी पॅंथर संघटनेच्या माध्यमातून समाजास न्याय देण्याचा प्रयत्न करू व अन्यायविरुद्ध संघटना ताकदीने लढण्यास मागे पुढे पाहणार नाही असे संघटनेचे अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे यांनी यावेळी सांगितले. तर समाजाचे सामाजिक उपक्रम राबवण्यास अडचण आल्यास सहकार्य करू व समाजाच्या वेगवेगळ्या योजना सर्व स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जातीने लक्ष घालू असे कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश वाघमारे यांनी तर आभार धोंडीराम कांबळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत