पायोनियर शैक्षणिक संकुलचे एन. एम.एम.एस. परिक्षेत उत्तुंग यश
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘नॅशनल मेरीट कम मिन्स स्काॅलरशीप’ (एन.एम.एम.एस) परीक्षेमध्ये पायोनियर निवासी गुरूकुल व पायोनियर सेमी इंग्लिश स्कूल य.मंगेवाडीने उज्वल यश मिळविले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेकडून डिसेंबर २०२४ मध्येघेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस. परीक्षेत पायोनियर निवासी गुरूकुल व पायोनियर सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल ने उत्तुंग यश मिळविले आहे. एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी
1) निवास सुभाष चोगुले (23 SELECTED - EWS-3).
सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी
१) श्रीधर आप्पा भोसले २)मंथन सुशांत बेंद्रे ३)श्वेता गणेश सूर्यवंशी
वरील सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याना मुख्याध्यापक श्री.अनिल येलपले सर, परीक्षा विभाग प्रमुख श्री.आशुतोष रुपनर सर , सतिश पिसे सर , संदिप बाबर सर ,सुरेश शिंदे सर ,संध्या घाडगे मॅडम वरील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांचे सत्कार प्रशालेमध्ये घेण्यात आले .या सत्कार समारंभास खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच अध्यक्ष श्री अनिल येलपले सर, पायोनियर निवासी गुरुकुल चे प्राचार्य श्री.अमोल रणदिवे सर ,पायोनियर पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री.सतीश देवमारे सर व व शाळेतील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. ग्रामस्था कडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. एन.एम्.एम्.एस.शिष्यवृत्ती धारक एका विद्यार्थ्यांला प्रत्येकी ६०,०००/- हजार रु .सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३८,४०० रु प्रमाणे १,१५,२००/-रु मिळणार . असे एकूण १,७५,२००/- रु मिळणार आहेत.
एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती व सारथी शिष्यवृत्तीसाठी यशस्वी विद्यार्थी , पालक, मार्गदर्शक शिक्षक तसेच सर्व संस्था कार्यकारणी सदस्य यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळे यशाचे उत्तुंग शिखर गाठता आले. त्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असे आपल्या मनोगतात संस्था अध्यक्ष अनिल येलपले सरांनी मार्गदर्शन केले.
या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.आशुतोष रुपनर सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत