नाझरे येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा
नाझरे प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, अक्कलकोट निवासी राजाधिराज स्वामी समर्थ महाराज की जय या जयघोषाने नाझरे ता. सांगोला येथे स्वामीभक्त माणिक स्वामी व सुधाकर कुंभार यांच्या घरी स्वामींचा प्रकट दिन साजरा करण्यात आला.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामी अभि गये नही, अभी भी जिंदा है. श्री स्वामी समर्थ शरीराने तुमच्यामध्ये नसले तरी नामस्मरण रूपाने जिवंत आहेत व यासाठी सर्वांनी नामस्मरण करा म्हणजे संकट समई स्वामी धावून येतील. सदर प्रसंगी बलवडी, नाझरे येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर नामस्मरण, पाळणा व दुपारी साडेबारा वाजता पुष्पांजली करण्यात आली. यावेळी शिवानंद स्वामी, सौ रोहिणी स्वामी, लिंग या स्वामी, सौ सोनाली स्वामी, महेश कुंभार, सौ. सोनाली कुंभार यांच्या शुभहस्ते महास्वामींची महाआरती करण्यात आली. तसेच महाप्रसाद ही वाटप करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत