डॉ.रामनाथ जराड यांचे कार्य आणि छायाचित्र गेले अंतराळात...! भारतासाठी ऐतिहासिक आणि आनंद देणारी घटना....!!
विशेष प्रतिनिधी :डॉ अमोल उबाळे
ज्येष्ठ समाजसेवक,पत्रकार, कवी,साहित्यिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रामनाथ जराड यांची माहिती आणि छायाचित्र नुकतेच अंतराळात गेले आहे
एप्रिल 2025 मध्ये जगभरातून वेगळ्या पद्धतीने कार्य करणाऱ्या,जगाला प्रेरणा देणाऱ्या काही निवडक व्यक्तींचे फोटो आणि माहिती अंतराळात पाठवण्यात आली आहे.
ही माहिती जग घडवणाऱ्या व्यक्ती आणि जगातील नावलौकिक मिळवलेल्या व्यक्ती यांची आहे या यादीमध्ये डॉ.रामनाथ जराड यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे भारतासाठी ही गोष्ट अतिशय आनंदाची आणि समाधानाची आहे.तसेच ही घटना ऐतिहासिक ठरली आहे. डॉ.जराड यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत,विश्वशांती दूत डॉ.सुधीर तारे यांनी मार्गदर्शन केले आहे.
त्यांची ही माहिती नासा अर्थात नॅशनल एरोनॉटिकल स्पेस अँड ऍडमिनिस्ट्रेशन सेंटर यांच्या माध्यमातून पाठवण्यात आली आहे.त्यांचा बोर्डिंग नंबर आहे M2M202608075863
त्यांची ही सर्व माहिती अंतराळामध्ये गेली आहे.आस्ट्रेलियन यूनिवर्सिटी, ग्रिफिथ युनिवर्सिटीने प्लैटिपुस मिशनच्या अंतर्गत एज्युकेशनल सैटेलाइट क्यूबसैट द्वारा डॉ जरा यांची माहिती अंतरिक्षात पाठवली आहे.
तसेच,रशियन स्पेस एजेन्सी जियोस्कैनने एज्युकेशनल सैटेलाइट अल्फेरोव 239 मार्फत डॉ.रामनाथ जराड यांची माहिती फोटोसह अंतरिक्षात पाठविली आहे.जगातील सर्व विद्यापीठातील ग्रैजुएट व रिसर्चसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
अंतरिक्षात नावे पाठविण्याचा अद्भुतीय,अविश्वसनीय, अकल्पनीय सन्मान यापूर्वी मिळालेले पंतप्रधान नरेन्द्र मोदी,माजी राष्ट्रपती
डॉ.ए पी जे अब्दुल कलाम नोबेल प्राईज नॉमिनेटर
डॉ.सुधीर तारे,नोबेल नामांकन प्राप्त डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील,नोबेल नामांकन प्राप्त डॉ.सुधा कांकरिया,नोबेल नामांकन प्राप्त धनगरी ढोल वादक पैलवान बाळासाहेब मंगसुळे,नोबेल नामांकन प्राप्त डॉ.विमल सुदर्शन बाफना, नोबेल नॉमिनी डॉ.चंदर कला सिंग,नोबेल नॉमिनी डॉ.शेक चांद पाशा आणि डॉ.सैय्यदा समीना परवीन,आदि मान्यवरांचा यात समावेश आहे.
डॉ.जराड यांनी पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून अनेक तळागाळातल्या पत्रकारांना एकत्र केले आहे आणि त्यांच्या साठी मोठे योगदान उभारले आहे.उत्तम अशी ग्रंथ निर्मिती, तळागाळातील आणि मागासलेल्या परिस्थितीत झगडणाऱ्या शेवटच्या माणसाच्या विषयीच्या आनेक कविता त्यांनी केल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अर्थात आत्ताच्या अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी गावचे सुपुत्र असलेले जराड हे शेतकरी आणि गरीब कुटुंबातून परिस्थितीवर मात करून परिस्थितीशी झगडून पुढे आले आहेत त्यांचे विचार हे समाजालाच नव्हे तर जगाला प्रेरणा देणारे असे आहेत.
विश्वशांती दूत डॉ.सुधिर तारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.जराड यांनी काम केले आहे. डॉ.बाळासाहेब मंगसुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या नेतृत्वाखाली हा सन्मान त्यांना मिळाला आहे त्याचप्रमाणे ऑरेंज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यासारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारानेही ते सन्मानित आहेत.समाजाच्या सर्व स्तरातून डॉ.जराड यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत