Breaking News

गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे सावरवाडी येथे प्रबोधन


 

सांगोला प्रतिनिधी 

         श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरले आहे व ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याचा सदा ध्यास लागून ते आचरणात आले पाहिजे. 

        जगाच्या संसारातील व परमार्थातील आपली ओळख सद्गुरु करून देतात व त्याचाच नित्य ध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची व आपली संपूर्ण ओळख होते व यासाठी भैरवनाथ मंदिर सावरवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर येथे रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन आयोजित केले आहे असे गुरु नरसिंह सरस्वती स्वामीभक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितले. सदर प्रबोधनास उपस्थित राहावे असे आवाहन शंकर जाधव, मारुती जाधव व संभाजी साठे यांनी केले आहे. तसेच गुरुभक्तीचा महिमा कसा आहे व त्याची प्रचिती कशी येते हे समजून येईल तरी यासाठी सर्व स्वामी भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे स्वामीभक्त स्वप्नील मगदूम व भिकाजी शेलार यांनी आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत