Breaking News

वझरे येथील बाबासाहेब पाटील यांचे निधन



नाझरे प्रतिनिधी 

        वझरे ता. सांगोला येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब यल्लाप्पा पाटील यांचे बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष 83 होते. शिक्षक नेते दत्तात्रय पाटील व डॉक्टर प्रकाश पाटील यांचे ते वडील होते. 

        पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता वजरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत