पायोनियर स्कूलच्या विद्यार्थ्यांची "रंगोत्सव इंटरनॅशनल आर्ट कॉम्पिटिशन"मध्ये उज्वल कामगिरी
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचालित पायोनियर पब्लिक स्कूल (CBSE), येलमार मंगेवाडी येथील विद्यार्थ्यांनी *"रंगोत्सव सेलिब्रेशन इंटरनॅशनल आर्ट कॉम्पिटिशन"* मध्ये आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या शाळेच्या सर्व सातही विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांमध्ये पारितोषिके पटकावत १०० टक्के यश मिळवले आहे.
या स्पर्धेत कु. द्रिती संदीप गायकवाड हिला द्वितीय क्रमांक,व कु. पूर्वा अतुल कंडरे हिला रंगभरण स्पर्धा मध्ये तृतीय क्रमांक मिळाला आहे.
या दोघींनाही "स्पेक्टॅक्युलर परफॉर्मन्स अवॉर्ड" देऊन गौरविण्यात आले आहे.
तसेच,कु. ईश्वरी रवींद्र कंडरे हिला हस्ताक्षर स्पर्धा मध्ये, तर कु. स्वरा वैभव लाडे व वेदिका विकास चौगुले यांना रंगभरण स्पर्धा मध्ये गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे.
कु. समर्थ नितीन येलपले व
कु. आरोही सचिन कंडरे यांना हस्ताक्षर स्पर्धा मध्ये सहभागासाठी सरप्राईज गिफ्ट मिळाले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीसाठी पायोनियर पब्लिक स्कूलला "ग्लोबल स्कूल अवॉर्ड" देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रभावी मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेचे प्राचार्य सतीश देवमारे सर आणि कलाशिक्षिका सौ. रुपाली गायकवाड मॅडम यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या यशाच्या निमित्ताने शाळेमध्ये भव्य पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अनिल येलपले सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या अकॅडेमिक इनचार्ज मृणाल राऊत मॅडम यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले.
या जागतिक स्तरावरील स्पर्धेत मिळवलेल्या यशामुळे पायोनियर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे आणि संपूर्ण शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत