Breaking News

पायोनियर पब्लिक स्कूल (CBSE) य.मंगेवाडी मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

    खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित पायोनियर पब्लिक स्कूल (CBSE) येथे थोर समाजसुधारक, स्त्रीशिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते आणि आधुनिक शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक माननीय अनिल येलपले सर यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली.

     या विशेष प्रसंगी शाळेच्या शिक्षिका सौ. रुपाली गायकवाड व सौ. प्रियांका मोहिते यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना समतेचे मूल्य, शिक्षणाचे महत्त्व व सामाजिक न्यायासाठी झगडण्याची प्रेरणा दिली.

             शाळेचे प्राचार्य मा.सतीश  देवमारे सर, अकॅडमिक इनचार्ज  मृणाल राऊत व सर्व शिक्षकवृंदांनी देखील प्रतिमेस अभिवादन करत महात्मा फुले यांच्या कार्यास विनम्र आदरांजली अर्पण केली.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ माहितीपर नव्हे, तर त्यांच्या विचारविश्वावर प्रभाव टाकणारा ठरला. उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करत त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत