Breaking News

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण प्रसंगी लहुजी पॅंथर सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.. अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे


 सांगोला प्रतिनिधी 

     महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरण व लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक 10 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता सांगोला येथे संपन्न होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 

     सदर प्रसंगी बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती ताई शिंदे, खासदार धैर्य शील मोहिते पाटील, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील इत्यादी उपस्थित राहणार आहेत तरी सदर कार्यक्रमास लहुजी पॅंथर सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत