Breaking News

मरवडे फेस्टिवल तर्फे रविराज शेटे यांचा सन्मान सोहळा संपन्न


 सांगोला प्रतिनिधी :

          छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रीडा मंडळ मरवडे  व मरवडे फेस्टिवल तर्फे

 पत्रकारितेच्या माध्यमातून बहुमोल योगदान दिल्याबद्दल सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांचा मानाचा फेटा, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, हार, शाल, ट्रॉफी देऊन भव्य सन्मान मरवडे ता. मंगळवेढा येथे करण्यात आला. 

        दामाजी शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल दादा सावंत, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, मा. चेअरमन अँड नंदकुमार पवार, सरपंच सौ. अंजली चौधरी, उपसरपंच दीक्षा शिवशरण, फेस्टिवल प्रमुख मार्गदर्शक सुरेश पवार इत्यादींच्या शुभ हस्ते रविराज शेटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांगोला तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्षा योगिता शांत शेटे मॅडम, शिक्षिका अन्नपूर्णा बिराजदार मॅडम, योगीराज शेटे, सौ. सुकन्या शेटे, प्रणव राज शेटे, सचिन बिराजदार, गोपाळ कांबळे इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत