Breaking News

०६ मार्च २०२५

बहुजन भारत संघटनेतर्फे पंचायत समिती सांगोला येथे विराट मोर्चाचे आयोजन...- अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे


 सांगोला प्रतिनिधी 

      बहुजन भारत सामाजिक संघटनेतर्फे बुधवार दिनांक 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सांगोला कार्यालयावर भव्य विराट मोर्चाचे आयोजन केले असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे यांनी सांगितले. 

     सध्या पंचायत समिती सांगोला येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून यामध्ये मागासवर्गीयांसाठी ग्रामपंचायत मध्ये 15 टक्के निधी ग्रामसेवक व सरपंच यांच्या संगनमताने इतर ठिकाणी खर्च होत असून यामध्ये भ्रष्टाचार होत आहे. तसेच ही कामे प्रामुख्याने मागासवर्गीय ठेकेदारांना प्राधान्य देऊन द्यावीत व समाज कल्याण तसेच महिला बाल विकास विभागातून मागासवर्गीयांना मिळणाऱ्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला असून संबंधित अधिकारी यांची चौकशी होऊन कार्यवाही करावी. तसेच दलित वस्तीमध्ये कामासाठी होणारा राजकीय हस्तक्षेप बंद करावा व घरकुलधारकांना मोफत वाळू पुरवठा तात्काळ करावा. तसेच घरकुल मंजुरीसाठी बँकेत जमा होणाऱ्या रकमेसाठी लाच मागणाऱ्या ग्रामसेवक व कारकून यांच्यावर कारवाई करावी. 

     सन 2022.. 23 व 24 मध्ये मागासवर्गीय लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या विविध योजना व लाभार्थी यादी गावोगावी सार्वजनिक ठिकाणी व दलित वस्ती मध्ये प्रसिद्ध करावी. तसेच या संबंधित गटविकास अधिकारी सांगोला, तहसीलदार सांगोला व पोलीस निरीक्षक सांगोला यांना निवेदन दिले असून, या सर्व मागण्यासाठी पंचायत समिती कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे तरी यामध्ये पुरुष महिला यांनी बहुसंख्येने हजर राहावे असे आवाहनही नितीन भाऊ रणदिवे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा