पंढरपूर : डॉ अमोल उबाळे
गेली वीस पंचवीस दिवस अधीक्षक अभियंता पुणे यांच्याशी संपर्क साधून पंढरपूर सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भाळवणी येथे गावाची वाढती लोकसंख्या तसेच महाविद्यालय व जि.प.प्रा.शाळा परिसरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर रोडवरून ये जा करणाऱ्या वाहनांपासून धोका आहे. तसेच बस स्टँड परिसरात सतत अपघात होत आहेत. यासाठी बस स्टँड परिसर, महिम चौक(चौफळा), व प्रा. शाळा गेट समोर (चौगुलेवाडी रोड) या ठिकाणी रंबल स्पीड ब्रेकर बसवून मिळावेत म्हणून पाठपुरावा केला त्याला यश मिळाले... तसेच सदर लढा देत असताना पालक मंत्री जयकुमार भाऊ गोरे,जिल्हाधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक साहेब, उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी पंढरपूर, तहसीलदार पंढरपूर, पत्रकार सेवा संघ सोलापूर, यांच्याशी पत्रव्यवहार करून दि.१०/०३/२५ पासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. सदर लढा देत असताना मा.आ.अभिजित आबा पाटील मा.आ.डॉ. बाबासाहेब देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख मा. श्री. संभाजीराजे शिंदे, मा. सरपंच राजकुमार पाटिल, पत्रकार सेवा संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ अमोल उबाळे, सांगोला गौरव न्यूज , युवा नेते नवनाथ शिंदे मेंबर,बापूसाहेब बुरांडे, अतुल गवळी, सचिन वाघमारे, तजिल भोसले, करणसिंह भोसले, महेंद्र वाघमारे,अमोल गायकवाड, मिलिंद कांबळे, नितीन गायकवाड, नितीन माणिक भोसले यांनी खंबीर साथ दिल्याबद्दल मोहन इंद्रजीत भोसले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व मिळालेले यश भाळवणी ग्रामस्थांना अर्पण केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा