मौजे अजनाळे ता सांगोला गावातील खातेदार यांच्याकडे पाणीपट्टी ७ लाख ५० हजार रु तर घरपट्टी १० लाख रू अशी एकुण १७ लाख ५० हजार थकबाकी असुन गावातील सर्व खातेदारांनी आपली घरपट्टी, पाणीपट्टी ३१ मार्च २०२५ अखेर ग्रामपंचायत कार्यालय येथे भरणा करुन ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे आव्हान ग्रामपंचायत अधिकारी संदिप सरगर यांनी केले आहे.
अजनाळे गावातील सर्व खातेदारांनी आपल्याकडे असणारी घरपट्टी, पाणीपट्टी, मुदतीमध्ये न भरल्यास पाणीपुरवठा खंडित केला जाईल ज्या खातेदारांनी पाणीपट्टी, घरपट्टी भरणा केलेला आहे त्याच खातेदारांना सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल तरी गावातील सर्व खातेदारांनी आपली थकीत असणारी घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे अन्यथा होणाऱ्या कारवाईस सामोर जावे लागेल असा इशारा ग्रामविकास अधिकारी संदिप सरगर यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा