Breaking News

अजनाळे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच अनिता पवार ॲक्शन मोडवर; प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याचा लावला धडाका.....


सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

आजनाळे ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच अनिता पवार यांनी नुकताच सरपंच पदाचा कारभार आपल्या हाती घेतला आहे. कारभार हाती घेतल्यापासून गावांमधील विविध विकास कामांचा व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यास सुरुवात करून प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याचा त्यांनी धडाका लावला आहे.

अजनाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा कारभार अनिता पवार यांनी १५ जानेवारी २०२५ रोजी पदभार हाती घेतला असून पदभर घेतल्यानंतर दोनच दिवसात  गावातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती.


काल बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी गावातील बेघर वसाहतीत सार्वजनिक शौचालय अंतर्गत अंदाजे ३ लाख ५० हजार रू खर्च करून सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यात आले आहे या शौचालयाचे बांधकाम पूर्ण होऊन एक वर्ष होऊन गेले तरी  येथील शौचालयाचे थोडे काम अपूर्ण राहिल्यामुळे अद्याप पर्यंत हे शौचालय बंद अवस्थेत असल्यामुळे येथील राहणाऱ्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केले जात होती. सरपंच अनिता पवार यांना या घटनेची माहिती समजाताच ग्रामपंचायत अधिकारी संदिप सरगर यांना घेऊन त्या ठिकाणी भेट देऊन बंद अवस्थेत असलेल्या शौचालयाची पाहणी करून अपूर्ण राहिलेले काम तात्काळ पूर्ण करून येत्या आठ दिवसात हे शौचालय सर्वांसाठी खुले करण्यात येईल असे सांगितले.या वेळी त्यांनी गटार, पाणी आरोग्य याविषयी येथील राहणाऱ्या नागरिकांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी चंद्रकांत पवार उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत