Breaking News

२० फेब्रुवारी २०२५

तिप्पेहळी ग्रामपंचायतवर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाचा झेंडा तिप्पेहळीच्या सरपंचपदी सौ अनिता माने यांची बिनविरोध निवड


सांगोला ; तालुका प्रतिनिधी 

तिप्पेहळी ता. सांगोला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाच्या सौ अनिता हनुमंत माने यांची बिनविरोध निवड झाली. सरपंचपदी निवड होताच माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी गावात गुलाल उधळून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला. 

गतवेळी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांनी एकत्रित स्थानिक गटाने एकत्रित निवडणूक लढवली होती. स्थानिक वाटाघाटीनुसार सरपंचपद दिपकआबा साळुंखे पाटील गटाला देण्याची वेळ आल्यानंतर माजी सरपंच तानाजी नरळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने सर्व सदस्यांनी तानाजी नरळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला होता. यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदाची काल गुरुवार दि 20 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय तिप्पेहळी येथे निवड पार पडली. या निवडीत रिक्त असणाऱ्या सरपंच पदासाठी एकमेव अनिता हनुमंत माने यांचा अर्ज आल्याने सौ अनिता हनुमंत माने यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा