सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
अजनाळे ग्रामपंचायतीच्या वतीने संक्रातीच्या निमित्ताने हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला आहे हळदी कुंकू कार्यक्रम हे एक निमित्त असते सर्व महिला एकत्र आल्यामुळे विचारांची देवाण-घेवाण होते महिला एकत्रित आल्यामुळे विकास होण्यास मदत होते स्री शक्तीची ताकद मोठी आहे असे प्रतिपादन अजनाळे गावच्या नूतन सरपंच अनिता पवार यांनी व्यक्त केला.
अजनाळे ग्रामपंचायतीच्या वतीने काल शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी माजी सरपंच सुजाता देशमुख, माजी सरपंच सुभद्रा कोळवले, ग्रामपंचायत सदस्या दिपाली लाडे, आरोग्य सेविका सिंधू गडदे, डॉ जगताप मॅडम, निकिता सरगर,राणी पोतदार, मा उपसरपंच अर्जुन येलपले, आरोग्य सेवक डॉ अशोक कलाल, आशा वर्कर पल्लवी धांडोरे, ज्योती येलपले, रंजना येलपले, सारिका आवटे, चैत्राली भंडगे, माणदेश फाउंडेशनच्या सोनाली मोरे, ग्रामविकास अधिकारी संदीप सरगर, युवा नेते चंद्रकांत पवार यांच्यासह बचत गटामधील सर्व महिला मोठ्या संख्येने हजर होत्या.
पुढे बोलताना सरपंच अनिता पवार म्हणाल्या की,स्री ही वेगवेगळ्या भूमिका बजावते आई,पत्नी,बहिण,आजी, भूमिका पार पाडून आपली जबाबदारी पार पाडत असते स्त्रीने स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे स्री जर आजारी पडली तर घरातील वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. माणदेश फाउंडेशन च्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन विविध व्यवसायांचे उपक्रम देऊन त्यांना अजनाळे ग्रामपंचायतच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे या उपक्रमासाठी महिलांनी प्रतिसाद द्यावा अजनाळे गावामध्ये 21 ते 22 बचत गटाच्या माध्यमातून महिला कार्यक्षम बनल्या आहेत त्यामुळे गावचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. महिलांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे महिलांनी नेहमी समाधानी असले पाहिजे जे आपल्याकडे आहे त्यातच समाधान मानले पाहिजे आईने मुलीचा आदर केला पाहिजे आईचे आणि मुलीचे नाते वेगळे आहे ज्यावेळी आईचे आणि मुलीचे नाते घट्ट होते त्यावेळी मैत्रीत रूपांतर होते. हळदी कुंकू कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढाच असतो की सर्व महिलांनी एकत्र देऊन आपल्या विचारांचे देवाणघेवाण करून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करूया. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कलाल यांनी मानले या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, मदतनीस बचत गटाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्यासह अन्य महिला मोठ्या संख्येने हजर होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा