सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित पायोनियर पब्लिक (CBSE) स्कूल, पायोनियर इंग्लिश मिडीयम स्कूल व पायोनियर निवासी गुरुकुल य.मंगेवाडी मधील विद्यार्थ्यांनी नॅशनल आर्ट कॉम्पिटिशन मध्ये उत्तुंग यश मिळवले आहे. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला
या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून य.मंगेवाडी चे उपसरपंच अनिल पाटील, मा. सरपंच दत्तात्रय मासाळ, त्रिमूर्ती अर्बन बँकेचे चेअरमन चंद्रकांत चौगुले, मा. सरपंच प्रकाश सोळसे, श्री.तुकाराम येलपले, पिंपरी येथील श्री.जाधव सर,सौं.मोरे मॅडम दिलीप येलपले सर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित हा सत्काराच कार्यक्रम पार पडला. स्कूल मधून एकूण २६ विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल , १६ विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल, ८ विद्यार्थ्यांना ब्रॉन्झ मेडल तर ६ विद्यार्थ्यांना सरप्राईज गिफ्ट मिळाले.तसेच सहभागी शिक्षकांना सरप्राईज गिफ्ट व प्रशस्ती पत्रक मिळाले. रंगोत्सव स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल पायोनियर स्कूल ला ' बेस्ट स्कूल फॉर फ्युचर 'हा अवॉर्ड मिळाला. संस्थेचे संचालक श्री. अनिल येलपले सर यांना एज्युकेशन रिफार्मर हा अवॉर्ड मिळाला.पायोनियर स्कूल मध्ये या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक शिक्षक रणदिवे सर व रणदिवे मॅडम यांना कलाविभूषन अवॉर्ड मिळाला.तर स्कूल मधील इयत्ता १० वि मध्ये शिकणारा स्वयंम सुरेश करमुडे या विद्यार्थ्याला आर्ट मेरिट अवॉर्ड मिळाला. तसेच ९ वी मध्ये शिकणारा प्रतिक निलेश झोरे या ही विद्यार्थ्याला आर्ट मेरिट अवॉर्ड मिळाला आहे. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले. .रंगोत्सव स्पर्धेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.रंगोत्सव स्पर्धेमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल पायोनियर शाळेच्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा