अजनाळे:सचिन धांडोरे:
अजनाळे ग्रामपंचायतीच्या वतिने उद्या दिनांक ३१ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती विद्यमान सरपंच अनिता पवार यांनी दिली आहे.
अजनाळे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच अनिता पवार यांनी नुकताच सरपंच पदाचा कारभार हाती घेतला आहे. कारभार हाती घेतल्यापासून त्यांनी अजनाळे गावांमध्ये विविध विकास कामांना गती देण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. महिलांना गावामध्ये एकत्र आणून महिलांमध्ये सुसंवाद घडवण्यासाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवहान सरपंच अनिता पवार यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा