सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
अजनाळे पंचक्रोशीच्या खडकाळ माळरानावर दि. 12 जानेवारी 1967 रोजी एक कळी उमलली ती कळी म्हणजे कोळवले मॅडम. घरापासून शाळेचे अंतर पाच किलोमीटरचे. तेही शाळेला चालत जावे लागायचे. त्या काळामध्ये मुलींच्या शिक्षणाबद्दल खूप अनास्थाच होती. आई वडील शेती करून उदरनिर्वाह करत आपल्या मुलांच्या प्रगतीचे स्वप्न पाहत होते .पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण जि .प.प्रा. शाळा अजनाळे येथे झाले पुढील आठवी ते बीएससी बी.एड .पर्यंत शिक्षण अहमदाबाद सांगली कोल्हापूर या शहरी भागात गेले. सर्व शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या आपल्या गावी आल्या. दि 10 जून 1993 रोजी विद्यालयात नोकरी मिळाली.शाळा सुरू होऊन अवघे एक वर्ष झाले होते साधारणता 50 60 पटसंख्या असलेल्या नवीन शाळेत मुलांच्या बरोबरीने मुलीही शिक्षण घेऊ लागल्या.या प्रशालेत मॅडमनी मुलींना आईप्रमाणे मार्गदर्शन करून त्यांच्या वेळोवेळी अडीअडचणी सोडवून ज्ञानाचे धडे दिले .त्यांचा आवडता विषय विज्ञान या विषयात त्या खूप प्रारंगत होत्या. विज्ञान हा विषय विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने शिकवत असत .वेळोवेळी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रयोग करून दाखवत. त्या त्यांच्या कौशल्यामुळे एक विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. शिकवण्याबरोबर शाळेतील स्वच्छता वृक्षरोपण ,फुल झाडांची लागवड याकडे त्यांचे खूप लक्ष होते मॅडमनी पहिले प्राधान्य शाळेला आणि नंतर आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिले माझी नेमणूक 2002 सली झाली .मला मॅडम समवेत 23 वर्षी सेवा करण्याची संधी मिळाली. या कालावधीत मॅडमनी शाळेत पूर्ण वेळ विद्यार्थ्यांसाठी दिल्याचे मी पाहिले .शाळेतील आरोग्य विभाग मॅडम कडेच असायचा. विद्यार्थी विद्यार्थिनी आजारी असतील तर त्यांना औषध गोळ्या द्यायच्या. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्यायच्या .त्यांनी सहल खेळाच्या स्पर्धा याप्रसंगी बाहेरगावी गेल्यावर त्यांचे मुला मुलींकडे खूप लक्ष असायचे .त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आईच्या मायेने वागवले .त्यांना मार्गदर्शन केले नोकरीच्या सुरुवातीच्या काळामध्ये शाळेमध्ये स्नेहसंमेलन प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जायचे. या कार्यक्रमासाठी गाणी निवडणे नृत्य सराव करणे खूप काळजीपूर्वक केले जायचे .नोकरीच्या 33 वर्षाच्या काळापैकी मॅडम पंधरा वर्षाचा काळ पर्यवेक्षिका पदावर होत्या व दीड वर्षाचा काळ मुख्याध्यापिका पदावर होत्या .या सर्व कालावधीत शिक्षक ,पालक ,विद्यार्थी यांचा समतोल साधला मुख्याध्यापक कालावधीमधील सहा महिने हनुमान विद्यालय सुपली तालुका -पंढरपूर .येथे 15 जून 2024 रोजी ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत सेवा दिली. अल्पावधीतच विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी तेथेही नावलौकिक कमवला नोकरी करीत असताना मॅडमला अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले .त्यांचे आपला एखादा विद्यार्थी शास्त्रज्ञ व्हावा असे स्वप्न होते .तेही काजल देशमुख या विद्यार्थिनीच्या माध्यमातून पूर्ण झाले .नोकरी करीत असतानाच मॅडमचा विवाह श्री प्रकाश विभुते सर यांच्याशी झाला. तेही सर अगदी मनमिळाऊ शिक्षक आहेत .मॅडमचा मुलगा इंजिनियर व मुलगी फॅशन डिझाईन विभागाचे शिक्षण घेत आहे .त्यांचे सासू-सासरे परिवार खूप मोठा व आनंदी आहे .अशा सर्व गुणसंपन्न मॅडम काल दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांचे पुढील आयुष्य आरोग्यदायी सुखाचे समृद्धीचे जावे ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद..
श्री लाडे बी.बी. सर अजनाळे तालुका सांगोला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा