Breaking News

२७ जानेवारी २०२५

पायोनियर स्कूल य. मंगेवाडी मध्ये प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा .....


 

सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

      स्वतंत्र भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन य.मंगेवाडी येथील पायोनियर  पब्लिक (CBSE) स्कूल , पायोनियर इंग्लिश & सेमी इंग्लिश स्कूल आणि पायोनियर निवासी गुरुकुल मध्ये भारत मातेच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या तसेच बलिदान दिलेल्या शुर वीरांना आदरांजली अर्पण करून विविध देशभक्तीपर उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

          सकाळी ८ वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी य.मंगेवाडी गावचे उपसरपंच अनिल पाटील मा.सरपंच दत्तात्रय मासाळ मा.सरपंच प्रकाश सोळसे , मा.सरपंच तुकाराम येलपले, त्रिमूर्ती अर्बन बँकेचे चेअरमन चंद्रकांत चौगुले , सैनिक निलेश पाटील , सैनिक अनिकेत बेहेरे , पिंपरी येथील श्री.जाधव सर , दिलीप येलपले सर ,  मोरे मॅडम , बोंबेवाडी चे प्रगतशील बागायतदार देवदास पाटील अजनाळे गावचे प्रगतशील बागायतदार राजकुमार कोळवले आणि अतुल येलपले इत्यादी मान्यवर , पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 

      संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले सर यांनी आपल्या देशाला इंग्रजांच्या जुलमी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जिगरबाज जवानांनी रक्ताचे पाणी करून कसे स्वातंत्र्य मिळवून दिले हे सविस्तर पटवून देवून भारत मातेला प्रणाम केला.आपण शहिदांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता आपल्या देशाविषयी अभिमान बाळगला पाहिजे..व देशाची एकात्मता व अखंडता टिकवून देशभक्तीचा विचार सतत जिवंत ठेवला पाहिजे.असे आवाहन केले.

      पायोनियर शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या भाषणांमधून ज्वलंत राष्ट्र भक्तीचा जागर जागृत केला. विद्यार्थांच्या भाषणातून राष्ट्रभक्ती व सर्वधर्मसमभाव दिसून आला.शाळेतील विद्यार्थ्यांनी  सुमधूर स्वरात देशभक्तीपर गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. देशभक्तीपर गाण्यांवर सुंदर नृत्ये विद्यार्थ्यांनी सादर केली.

          यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक साहसी कवायती सादर केल्या. तसेच रंगोत्सव स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थांना पारितोषिके, सन्मानचिन्हे आणि सन्मानपत्रे देण्यात आली.

     प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले सर , CBSE प्रिंसिपल सतीश देवमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख परवीन मिस , सर्व विभाग प्रमुख , सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम यशस्वी झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष रूपनर सर यांनी केले तर आभार पूजा होटे मॅडम यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा