प्रतिनिधी - संतोष कदम.
वालचंदनगर :- परभणी शहरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना काही समाजकंटकांनी केली. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख मा. संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वात इंदापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोषींवर कडक कारवाई करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, भिमसैनिकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावे , भीमसैनिकांवर झालेले गुन्हे त्वरित मागे न घेतल्यास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्यावतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .या मागणीचे निवेदन इंदापूर चे तहसीलदार मा. जिवन बनसोडे साहेबांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा