अजनाळे सचिन धांडोरे : अभ्यासावितिरक्त विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेगवेगळे उपक्रम राबवत आहे मात्र अजनाळे ता सांगोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक ही शाळा अतिशय वाहतुकीचे वर्दळ असलेल्या मार्गावर असल्याने शाळेच्या आवारास संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी शाळेच्या वतीने वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय यांच्याकडे करून देखील ग्रामपंचायतीने या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक ,विद्यार्थी पालक यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संरक्षण भिंत नसल्याने शाळेतील मालमत्तेची सुरक्षा वाऱ्यावर आली असून शाळेचा परिसर भिंतीविना गुरांसाठी कुरणच बनले आहे अशी दयनीय अवस्था येथील जिल्हा परिषद शाळेची झाली आहे. शिक्षकांचा हक्क कायद्यानुसार शाळेची पक्की इमारत, शिक्षक, मुख्याध्यापक साठी स्वतंत्र खोली, क्रीडांगण तसेच संरक्षण भिंत आधी भौतिक सुविधा असणे बंधनकारक आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळा उभारणीपासून त्या ठिकाणी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा खर्च केला जातो परंतु आजही संरक्षण भिंतीविना, सुख -सुविधा विना शाळा वंचित असल्याचे उघड झाले आहे.
संरक्षण भिंत नसल्याने जुगार, मटका ,मद्यपींसाठी तर शाळेचा परिसर दारूचा अड्डा बनला असल्यामुळे शाळेच्या व्हरांड्यातच रिकाम्या झालेल्या बाटल्या फोडल्या जात असल्यामुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना दुखापत झाल्या असल्याच्या घटना घडल्या आहेत. या संदर्भात अनेक वेळा अजनाळे ग्रामपंचायत यांच्याकडे लेखी अर्ज देऊन मागणी करून सुद्धा झोपलेल्या ग्रामपंचायतीने या मागणीबाबत उदासीनता दाखवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे वेळीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संरक्षण भिंत पूर्ण करावी अशी मागणी मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी, पालक यांच्यामधून जोर धरू लागली आहे.फोटो
चौकट : अजनाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुभद्रा कोळवले ,उपसरपंच दत्तात्रय (बापू) कोळवले, ग्रामसेवक संदीप सरगर यांच्याकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळे येथील संरक्षण भिंतीची मागणी अनेक वर्षापासून ग्रामपंचायत यांच्याकडे मागणी केली जात आहे परंतु ग्रामपंचायतीने या मागणीला केराची टोपली दाखवली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
चौकट : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्यावतीने आम्ही अजनाळे ग्रामपंचायतकडे संरक्षण भिंत,स्टेज, खिडक्या, इत्यादी मागणी केली आहे परंतु आमची आणखी कोणतीच मागणी पूर्ण झाली नाही.
मुख्याध्यापक एकनाथ गुरव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा