Breaking News

२२ ऑगस्ट २०२४

पंचायत समितीचे माजी वरिष्ठ सहाय्यक अधिकारी मोहन वाघमारे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..


 अजनाळे:

अजनाळे गावचे रहिवाशी व  सांगोला पंचायत समितीचे माजी वरिष्ठ सहाय्यक अधिकारी मोहन रामचंद्र वाघमारे यांचे काल गुरुवार दि २२ ऑगस्ट २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले निधनासमयी त्यांचे वय ६५ वर्ष इतके होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले दोन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्राचार्य संजय वाघमारे व  विकास वाघमारे यांचे ते बंधु होते. त्यांचा स्वभाव शांत व मनमिळावु होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता गोपाळपूर रोड , पंढरपूर येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा