विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
इंदापूर :- पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष विनोदजी पत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील चांदणे जिल्हा व तालुका समितीच्या वतीने आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024 व अतिथी शिक्षक, विद्यार्थी सन्मान सोहळा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने के एन भिसे कॉलेज येथील सेमिनार हॉल कुर्डूवाडी येथे पार पडला. महामानवांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रस्तावना करून प्रमुख अतिथी प्राचार्य मा. अनुपमा पोळ मुख्याध्यापक मा. रावसाहेब पाटील ,संत सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयंत करंदीकर, नगरपालिका मंडळ पंढरपूर समन्वयक मा.रामचंद्र बोडरे, पत्रकार संरक्षण समितीचे पुणे जिल्हा सचिव डॉ. सिद्धार्थ सरवदे, मुख्याध्यापक अविनाश भालशंकर , प्रा. विलास जगधने, मुख्याध्यापक विनोद वर, अनिल पवार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024 मुख्याध्यापक गौतम सोनवले नगरपालिका शाळा क्र.8 पंढरपूर MA ,Ed, DSM शैक्षणिक क्षेत्रामध्ये बहुमूल्य योगदान दिल्याने व सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याने हा पुरस्कार सन्मानित करण्यात आला .
तसेच इयत्ता दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याने यांचाही गौरव करण्यात आला . यावेळी मानसी बापू जानराव, पूजा शाहू कांबळे, दीक्षा सोमनाथ चांदणे, सेजल हनुमंत उबाळे, तोहीद अब्बास शेख, अब्दुल्ला वजीर सय्यद, इत्यादी अनेक विद्यार्थ्यांचा आई-वडिलांसह शाल प्रशस्तीपत्रक, सन्मान चिन्ह, पुष्पहार व गुलाब फुल देऊन सन्मानीत करण्यात आले. पत्रकार संरक्षण समिती बार्शी ता. सचिव ओंकार गायकवाड, करमाळा ता. अध्यक्ष भालचंद्र गाडे, पत्रकार गणेश रिकिबे,, पत्रकार विजय वाघमारे, लिपिक दादा कांबळे, अशोक ओहळ, सौदागर ताकतोडे, शरद भालशंकर , शिंदे सर , शिंगे सर, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पत्रकार कालिदास जानराव यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास विलास जगधने यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा