Breaking News

उद्योजक प्रकाश येलपले यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळे येथिल मुलींना मोफत सायकल वाटप...


 अजनाळे:सचिन धांडोरे:  १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध उद्योजक प्रकाश धर्मराज येलपले यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळे येथील ७ गरीब व गरजू मुलींना मोफत सायकल वाटप करुन  सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. याप्रसंगी सरपंच सुभद्रा कोळवले, धर्मराज येलपले, विष्णू देशमुख, चंद्रकांत कोळवले, सचिन धांडोरे, ग्रामसेवक संदीप सरगर, सोमनाथ खंडागळे, महादेव भंडगे,बबन कुरे, लक्ष्मण गुरव, लक्ष्मण येलपले, महादेव लाडे, धर्मराज येलपले, शामराव गुरव, उत्तम लाडे, राहुल करमुडे, मुख्याध्यापक एकनाथ गुरव, शितल गुरव मॅडम, ज्योती मोरे मॅडम यांच्यासह अन्य पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

प्रकाश येलपले यांनी गरीब विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या हेतूने जवळपास ७ सायकल मुलींना वाटप  केल्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद झाला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ हार फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत