सांगोला / समाधान धांडोरे
आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीवर रविवार दि ९ जून रोजी विकास विद्यालय अजनाळे येथे इयत्ता दहावीच्या "टीम गोल्डन १९९८-९९" बॅचचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित विकास विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज अजनाळे चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रल्हाद दादा येलपले, मुख्याध्यापिका सिंधू कोळवले ,सहशिक्षक अप्पाराव धांडोरे , शंकर कोळवले, भिवा बोरकर, परिचारक शंकर लाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
टीम गोल्डन १९९८-९९ या बॅचला तब्बल पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने मोठ्या उत्साहात हा स्नेह मेळावा पार पडला प्रत्येक माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला जीवन प्रवास सांगितला काहींना बोलताना अश्रू अनावर झाले या बॅच मधील काही विध्यार्थी आज शिक्षक, सैनिक, उद्योजक, इंजिनियर तर काही शेतकरी झाले यातील मुली ही चांगल्या गृहीणी झाल्या.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद येलपले बोलताना म्हणाले सध्या मुलांपेक्षा मुलींची शिक्षणाची पातळी ही वाढलेली दिसत आहे आणि गुणवत्तेतही मुलींचा समावेश जास्त आहे त्यामुळे मुलांकडे हे आपण विशेष लक्ष द्यावे आणि त्यांना शिक्षणामध्ये पुढे घेऊन जावे.
त्यानंतर मुख्याध्यापिका आणि टीम गोल्डन १९९८-९९ या बॅचच्या वर्गशिक्षिका सिंधू कोळवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ही बॅच शाळेचा 100% निकाल लावणारी पहिलीच बॅच होती त्यामुळे ही बॅच माझ्या आवडती आणि कायम आठवणीत राहील आणि माजी विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या
त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी मिळून प्रशालेच्या पटांगणामध्ये वृक्षारोपण केले
सकाळच्या सत्रातील प्रशाले वरचा कार्यक्रम संपवून सांगोला येथील "फाइव स्टार रेस्टॉरंट" येथे माजी विद्यार्थ्यांची मनोगते आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
त्या कार्यक्रमास विकास विद्यालय अजनाळे चे माजी मुख्याध्यापक शामराव कोळवले यांना निमंत्रित करण्यात आले होते
सत्कार समारंभ नंतर बोलताना ते म्हणाले मी हा स्नेह मेळावा पाहून भारावून गेलो
माझा प्रत्येक विद्यार्थी त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वी झालेला पाहून मला फार आनंद झाला
प्रत्येक मित्र-मैत्रिणीने एकमेकांशी आपुलकीने संवाद साधून आनंद व्यक्त केला
टीम गोल्डन च्या वतीने डाळिंब व्यापारी हनुमंत पुजारी यांना "टीम गोल्डन जीवनगौरव पुरस्कार" प्रदान करण्यात आला आणि सर्व सदस्यांना आकर्षक गिफ्ट वस्तू भेट देण्यात आल्या
तसेच सांगोला शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि गजानन स्टील या उद्योग समूहाचे मालक अशोक यड्रावकर यांनीही सर्व माजी विद्यार्थ्यांना वैयक्तिक भेटवस्तू वाटप केल्या
हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे भारतीय सैन्य दलातील हवालदार पदी कार्यरत असलेले जनार्दन येलपले यांनी विशेष कष्ट घेतले
या कार्यक्रमाचा समारोप होताना यानंतर आपण लवकरच भेटू असा आशावाद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता
शेवटी अशोक येड्रावकर यांच्या निवासस्थानी जाऊन सर्वांनी चहाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता केली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा