Breaking News

१३ जून २०२४

ART सेवेला 20 वर्षे पूर्ण वैद्यकीय अधीक्षक, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना सन्मान चिन्ह देऊन गुणगौरव.


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम .       

पंढरपूर :-    बुधवार दिनांक 12/6/2024 रोजी  उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर  येथे एचआयव्ही सह जीवन जगणाऱ्या लोकांसाठी शासनाच्या वतीने एआरटी सेंटर मधून औषध उपचार मिळवून देण्यासाठी सेवा केंद्र सुरू केले या सेवेला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्हा उपरुग्णालय मधील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय वरिष्ठ  व कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह, शाल , गुच्छ देऊन  गौरव करण्यात आला तसेच 20 वर्षापासून औषध उपचार घेत एच आय व्ही सह जीवन जगणाऱ्या रुग्णांना प्रोटीन पावडर, वृक्षरोप व शाल, पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेशकुमार सुडके, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ए आर टी सेंटर डॉक्टर सयाजीराव गायकवाड,  अनुराधा वाघमारे आहार तज्ञ, डॉक्टर अविनाश वूईके, डॉक्टर विनिता कार्यकर्ते,  संतोष शेंडगे प्रोजेक्ट कॉडनेटर विहान प्रकल्प या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उपस्थितांचे स्वागत  रूपाली देवकर लॅब टेक्निशन यांनी केले . 

डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांनी प्रस्ताविक करताना सांगितले की, एच आय व्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तीने एआरटी सातत्य ठेवून सकस आहार व्यायाम, यामुळे जीवन उंचावते महाराष्ट्र राज्यातील तालुकास्तरीय पहिले एआरटी सेंटर असून ऑगस्ट 2009 मध्ये स्थापना झाली तेव्हापासून एच आय व्ही सहज जीवन जगणाऱ्या रुग्णाला औषध उपचार सेवा देण्याचे कार्य सेंटरच्या माध्यमातून आज पर्यंत सुरू आहे. या सेवेचा गौरव म्हणून 2016साली महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ART सेंटर म्हणून आरोग्य मंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आले. असे सांगितले. तसेच अनुराधा  वाघमारे मॅडम आहार तज्ञ यांनी सकस आहाराचे महत्त्व पटवून दिले.

 यावेळी  मीनाक्षी कदम , युवराज वांगी, संदीप देशमुख ,दीपक गोरे  समुपदेशक  रूपाली देवकर, लॅब टेक्निशियन  सुज्ञता गायकवाड फार्मासिस्ट ,  नागेश देवकर व स्वाती कसबे माहिती व्यवस्थापक  वैशाली वाघमारे स्टाफ नर्स बाळासाहेब पांढरे केअर ऑडिनेटर यांचा शाल, गुच्छ देऊन  सन्मान करण्यात आला. 

परम प्रसाद चॅरिटेबल सोसायटी प्रकल्प संचालक फादर सानू के यु ,  संग्राम सिंह जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून विहान प्रकल्पाचे हेल्थ प्रमोटर  सुनील चांदणे,  राजश्री टकले,  तुकाराम साठे, भारत सोनवले,  किशोर जाधव,  धनंजय कुंभार,  मेघा चंदनशिवे यांनी परिश्रम घेतले.

 यावेळी एचआयव्ही सहजीवन जगणारे बहुसंख्या स्त्री, पुरुष उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पुरुषोत्तम कदम यांनी केले. तर आभार  संतोष शेंडगे यांनी  मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा