Breaking News

०२ मे २०२४

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर!


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

वालचंदनगर :-( ता.इंदापुर ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दरवर्षी इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करत असते. सदर इयत्तेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड व स्पर्धा परीक्षेची तयारी या उद्देशाने महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती परीक्षा घेत असते. या शिष्यवृत्ती परीक्षेचे निकाल 1 मे रोजी जाहीर झाले.

        या शिष्यवृत्ती परीक्षेत श्री वर्धमान विद्यालयातील तब्बल 17 विद्यार्थी पात्र झाले असून  इयत्ता पाचवी चे 11  तर इयत्ता आठवीचे 6 विद्यार्थी पात्र झाले आहेत. इयत्ता पाचवीचे अरमान आळंद 218, मयुरेश मेटकरी 208, मानसी दबडे 206, वेदिका रणमोडे 176, हर्षाली कुंभार 176, संस्कृती सावंत 174, साक्षी सोनटक्के 152, श्रेयश गायकवाड 132, समृद्धी शिरतोडे 128, धनराज रणमोडे 124 तर इयत्ता आठवीचे प्राजक्ता कुंभार 236, प्रज्वल थोरात 194, ईश्वरी पानसरे 172, अनुष्का धापटे 172, श्रावणी भुजबळ 148, स्नेहल कदम 120 गुण प्राप्त करून शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत.

        इयत्ता पाचवी गुरुकुल वर्गातील विद्यार्थ्यांना सुरज मोरे, अनिल गवारी, देवराम प्रधान, शुभांगी शेंडगे व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना गोरख निकम, शुभांगी आगलावे, सारिका हिप्परकर व आश्विनी पांढरपट्टे यांनी मार्गदर्शन केले. सर्व शिक्षकवृंदांनी इयत्ता पाचवीच्या गुरुकुल वर्गासाठी व इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय वेळेव्यतिरिक्त अधिकच्या वेळेत मार्गदर्शन केले. तब्बल 60 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेतला. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त झाले आहे.

     विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त करून विद्यालयाची उत्तुंग निकालाची परंपरा राखली आहे यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन शाळा समिती अध्यक्ष मकरंद वाघ, उपाध्यक्ष प्रशांत महामुनी प्राचार्य हनुमंत कुंभार, उपमुख्याध्यापक अरुण निकम, उपप्राचार्य रामनाथ नाकाडे, पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे, पर्यवेक्षक शिवप्रसाद कुलकर्णी व सर्व शिक्षक वृंद यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा