मोरोपंतांच्या बारामतीत रंगला काव्य मेळा...
विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
बारामती :- बारामती परिसरात पंचक्रोशी प्रकाशन साहित्य मंडळ वतीने ३१ मार्च २०२४ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय ६ वे काव्य संमेलन तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला...
यावेळी सागर वायाळ संपादित "कविता अंतरपटलातील" काव्य संग्रह व युवराज खलाटे लिखित जॅकपॉट कथा संग्रह प्रकाशित करण्यात आला..
कार्यक्रमात एकूण १२० कवींनी सहभाग नोंदवला ..मुंबई,पुणे,सातारा,अ.नगर, इंदापूर,वालचंद नगर,वाई,बारामती या परिसरातून कवींनी हजेरी लावली होती.
पंचक्रोशी प्रकाशन साहित्य मंडळ वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त विद्यार्थिनींना गुण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,याच बरोबर वयाच्या पासष्टी नंतर मेरोथोन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या माननीय लता करे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.त्याच बरोबर प्रतिमा गुरव व प्रतीक्षा मांडवकर यांच्या वाढदिवस विशेष काव्य स्पर्धा विजेते स्पर्धक सन्मानित करण्यात आले.
प्रा. कोकरे सर व हनुमंत चांदगुडे सर यांनी उपस्थित मान्यवरांना साहित्याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष आशा दळवी यांनी कविता कशी असावी यावर आपले मत मांडले.अलका रसाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.सुवर्णा जमदाडे,सिध्दी पवार यांनी स्वागत गीत सादर केले तर मनवा गायकवाड ,भावना जाधव व उज्वला कुंभार यांनी आपल्या नृत्य कलेने गणेश वंदना सादर केली.कार्यक्रमा दरम्यान सागर वायाळ यांनी उपस्थित मान्यवरांना पुस्तक भेट दिले.
यावेळी आयोजक सोमनाथ सुतार सर,अध्यक्ष बाळासो कर्चे सर,हभप सोमनाथ जाधव,सरपंच हा.मा.जगताप,युवराज खलाटे,वाचकवेडी सुनंदा करचे,वनिता जाधव,वनिता भूतकर,आम्रपाली धेंडे,योगिता कोठेकर,लक्ष्मण शिंदे,राहुल निकम,दामिनी ठिगळे,मुकुंद मोरे,पत्रकार आदी मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निवेदन हभप सौ. शुभांगी सोमनाथ जाधव यांनी केले व दत्तात्रय भोसले यांनी आभार प्रदर्शन मानले...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत