विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
वालचंदनगर :- (ता. इंदापूर) श्री.वर्धमान विद्यालयामध्ये 1978 च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या तीन लाख 50 हजार देणगीतून विद्यालयामध्ये वंडरलॅब उभारण्यात आली. याच वंडरलॅबचे उद्घाटन आणि अर्पण सोहळा दि. 17 /4 /2024 रोजी 1978 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमासाठी माजी शिक्षक श्री .माळवदकर आणि श्री. साळुंखे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी डब्ल्यू आय एल चे व्हाईस प्रेसिडेंट श्री. धीरज केसकर, शाळा समिती अध्यक्ष श्री. मकरंद वाघ, विद्यालयाचे प्राचार्य श्री. हनुमंत कुंभार, उप मुख्याध्यापक श्री. अरुण निकम, उपप्राचार्य श्री. नाकाडे, पर्यवेक्षक श्री. हिरवे , श्री . कुलकर्णी उपस्थित होते.
वंडरलॅबचा हेतू लर्निंग सायन्स थ्रू टॉईज हे शिवानी पेठे यांनी समजून दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले. या कार्यक्रमात आपले मनोगत श्री. आव्हाड यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अरुंधती अंबिके तर कार्यक्रमाचा समारोप वर्षा कुंभार यांनी आभार प्रदर्शनाने केला.
विद्यालयाच्या प्रगती बाबत ठिकठिकाणी सकारात्मक चर्चा चालू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा