Breaking News

बी टीम चा शिका पुसणार वंचित युवक प्रदेशाध्यक्ष - निलेश विश्वकर्मा


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

औरंगाबाद -  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही लोक पेरलेले आहेत. काँग्रेससोबत आघाडी केल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही, असा समज त्यांच्याकडून पसरविला जातो. तसेच वंचितवर 'बी टीम' असल्याची अशी टीका केली जाते. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी तरुण कार्यकत्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी सांगितले. राज्यात वंचित किमान दहा जागांवर विजय मिळवेल, असा दावाही त्यांनी केला.


वंचित बहुजन युवा आघाडीचा विभागीय मेळावा सोमवारी (ता. १ ) तापडिया नाट्य मंदिर येथे पार पडला. मेळाव्याला मार्गदर्शन करण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली. 


उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीत प्रादेशिक पक्ष सत्ता स्थापन करीत असतील तर महाराष्ट्रात वंचितही सत्ता स्थापन का करू शकत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तिसऱ्या आघाडीत 'एमआयएम' पक्ष नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मागील निवडणुकीत 'वंचित 'ला राज्यभरात ४८ लाख मते मिळाली होती. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे. उलट त्यांचे मतदान घटले आहे. 'वंचित'चा आधार कायम आहे. नागपूर आणि कोल्हापूर येथे 'वंचित'ने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. अकोला, नांदेड, हिंगोली, अमरावती औरंगाबाद रामटेकसह दहा जागांवर विजयाची खात्री आहे, असेही त्यांनी सांगितले.


युवा आघाडीचे जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे, औरंगाबाद पुर्व जिल्हाध्यक्ष जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रभाकर बकले, पच्श्रिम जिल्हाध्यक्ष योगेश बन,जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष सतीश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत