Breaking News

बसपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत काळुराम चौधरी यांचा समावेश .


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

बारामती दि.२८: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत बहुजन समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी काळुराम चौधरी यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.बसपाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोणारे यांनी  काळुराम चौधरी यांची बसपाच्या स्टार प्रचारक पदी निवड केली आहे.


दरम्यान,यावेळी बोलताना चौधरी म्हणाले कि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपाच्या प्रमुख बहन मायावती यांनी स्टार प्रचारकाच्या यादीत माझा समावेश करून माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल पक्षश्रेष्टींचे आभार मानतो.या विश्वासास मी पात्र ठरून दिवसरात्र मेहनत घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत बसपाचे जास्तीतजास्त उमेदवार निवडणून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत