अजनाळे - कमलापूर रस्त्यावर पडलेले खड्डे संजय बनसोडे यांनी श्रमदान करून बुजवले; झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार?..
अजनाळे ग्रामपंचायतीचे शिपाई संजय बनसोडे यांनी काल शनिवार दि २ मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास खोऱ्या पाटी घेवुन अजनाळे कमलापूर रस्त्यावर मोठमोठे पडलेले खड्डे बुजवण्यास सुरुवात केली होती त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात होते.
अजनाळे ते कमलापूर हा अवघ्या ७ किलोमीटर अंतर असलेल्या डांबरीकरण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे दोन चाकी चार चाकी वाहन धारकांना आपले वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे काही वेळा याच रस्त्यावर छोटे-मोठे अपघात घडले आहेत त्यामुळे वाहनधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.अजनाळे ग्रामपंचायतीच्या वतीने अनेक वेळा हा रस्ता दुरुस्ती करावा या संदर्भात लेखी अर्ज देऊन सुद्धा झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या अर्जाला केराची टोपली दाखवली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अजनाळे कमलापूर येथील ग्रामस्थांचा अंत न बघता तात्काळ हा रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी अजनाळे कमलापूर ग्रामस्थांमधून मोठ्या प्रमाणात केले जात आहे..


कोणत्याही टिप्पण्या नाहीत