ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपर वर मतदान घ्या अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल मंगळवेढा येथे वंचित बहुजन आघाडी चे तहसीलदारांना निवेदन..
मंगळवेढा प्रतिनिधी : येताळा खरबडे
आज वंचित बहुजन युवक आघाडी मंगळवेढा तालुक्याच्या सर्व पदाधिकारी आणि मंगळवेढा तालुका वंचित बहुजन आघाडी सर्व कमिटी पदाधिकारी यांनी मंगळवेढा तालुका तहसीलदार साहेब यांना येत्या निवडणुकीत EVM मशीन द्वारे मतदान न घेता बॅलेट पेपर वर घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारे निवेदन देण्यात आले..._* त्यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष मा.अशोक माने, युवा तालुकाध्यक्ष मा.सिध्दार्थ शिंदे, युवा शहर अध्यक्ष मा. अब्दुल आतार , युवा ता.महासचिव मा.राहूल शिवशरण, युवा ता.सचिव मा.रोहिदास भोरकडे, युवा ता. उपाध्यक्ष मा.विशाल रावळकर , युवा शाखा अध्यक्ष मा.राहुल शिंदे इ. पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत