Breaking News

लोकसभा निवडणूकीचा निकाल वंचित बहुजन आघाडी चाच असला पाहिजे - अरुंधती ताई शिरसाट


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

औरंगाबाद  :-  लोकसभा मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडी च्या पाठिंब्यामुळे अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाला जिंकता आला नाही तो ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद करांनी जिंकून दाखवला त्याचं जोमाने येणाऱ्या लोकसभा निवडणूकीचा निकाल वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने लावा असे आवाहन यावेळी अरूंधती ताई शिरसाट यांनी मार्गदर्शन करताना केले .


वंचित बहुजन आघाडी मध्ये आज वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांच्या अध्यक्षतेखाली युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, मराठवाडा सचिव तय्यब जफर, पुर्व शहराध्यक्ष मतीन पटेल, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, आदींच्या  उपस्थितीत 

विक्रम कांबळे,दादाराव आढाव, भगवान बनसोडे, यांच्यासह प्रकाश बोर्डे, मनताराम दगडूजी बनसोडे, दिलीप किसनराव साळुंखे, अनिल रामदास साबळे, राजेश एकनाथ दांडगे, सर्जेराव गोविंदराव सदाशिवे, गोरख अशोक वाघमारे, संतोष सखाराम जिगे ,रोहिदास वैजनाथ कांबळे, शेख युनुस शेख उस्मान, गौतम नामदेव रगडे, सुभाष सुखदेव मगरे, अंकुश साळवे, योगेश सुरडकर,दीपक शिंदे, किरण पठारे, आदींसह शेकडो युवकांनी प्रवेश केला .


यावेळी अरुंधती ताई शिरसाट जिल्हाध्यक्ष प्रभाकर मामा बकले यांनी प्रवेशकर्त्याचा सत्कार केला. 


यावेळी  जिल्हा उपाध्यक्ष रामदास वाघमारे,एच एम एकबाल,महासचिव सुमित जामनीक, निखिल अंभोरे,अजय मगरे,अजिनाथ पवार,मुजाभाऊ तुपसमिद्रे, भगवान बनसोडे, जावेद पटेल, संतोष सुरडकर, सतिश निकम आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत