Breaking News

बारामतीत बहुजन नायक कांशीरामजी यांना जयंतीनिमित्त अभिवादन..


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

बारामती :- दि.१५: बामसेफ तथा बहुजन समाज पक्षाचे संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी जयंती निमित्त शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले.यावेळी बहुजन समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र्र झोन प्रभारी काळुराम चौधरी आणि शुभम अहिवळे यांच्या हस्ते कांशीरामजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी चौधरी यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थितींना मार्गदर्शन केले.


याप्रसंगी,चंद्रकांत खरात,गौतम शिंदे,अक्षय अनपट,विशाल घोरपडे,प्रफुल वाघमारे,रोहित लोंढे,प्रफुल राठोड,बाळासाहेब पवार,सुनील चव्हाण,रितेश गायकवाड व आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत