अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचा जनलोक वार्ता पुरस्कार .. अल्फाज टाईम्स चे मुख्य संपादक राजेखान पटेल यांना "आदर्श संपादक - 2024" पुरस्काराने सन्मानित .
विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
पुणे : अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघांचा जनलोक वार्ता पुरस्कार सोहळा २०२४ वानवडी, पुणे येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात रविवार दि. १७ मार्च रोजी पार पडला. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या सन्मानसोहळ्यात अल्फाज टाईम्स चे मुख्य संपादक श्री. राजेखान पटेल यांना "आदर्श संपादक-2024" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अल्फाज टाईम्स च्या उपसंपादिका सौ.प्रतिमा शिंदे व सोलापूर जिल्हाप्रमुख श्री. सुनिल चांदणे , गणेश जोशी उपस्थित होते . दरवर्षी पुरस्कार पत्रकार संघाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे हे ६ वे वर्ष असून अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचा १० वा वर्धापन दिन यावेळी साजरा करण्यात आला. समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १०० व्यक्तींना यावेळी सन्मानपत्र, मानचिन्ह, श्रीफळ व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सिने रेकॉर्ड गाण्यावर नृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघात १० वर्ष प्रामाणिकपणाने काम करणारे समिती पदाधिकारी नईम मेहदी, विकास पटवा व दिलीप मेमाणे यांना जिवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी संस्थापक राजू शिंगाडे, सौ. संगीता शिंगाडे कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळे, अध्यक्ष इस्माईल तांबोळी, रणजीत चव्हाण, दत्ता भगत, महेश कणकुरे, नईम मेहंदी, चंद्रकांत सलवदे, लतीफ शेख, मुस्तफा चाबरू, मुन्ना शेख, अनिल मुदगुंडे, ओंकार शिंगाडे, निर्मला कांबळे, धर्मपाल कांबळे, संदीप जगताप, नवीन आदिवाल, सलीम तांबोळी, दयानंद गौडगाव, संतोष गाडेकर, उत्तम खेसे, राजू चव्हाण, राजू पलंगे, मनीष कांबळे अशोक मलघे, विजय धादवड, योगेश रांजणे, प्रशांत भोसले, दीपक भस्मे, गणेश जाधव, विजय कानवडे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन जनलोक वार्ता समिती सदस्य व पदाधिकारी यांनी केले होते. प्रस्तावना राजू शिंगाडे निवेदन लतीफ शेख नईम मेहंदी यांनी केले .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत