विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
बारामती : दि.२३: येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी,बा.न.प चे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे,भारत मुक्ती मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुशिल अहिवळे,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष मनोज केंगार,सुरज शिंदे,प्रशांत लांडे व आदी उपस्थित होते.
दरम्यान,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे सदस्य गौतम शिंदे,शुभम अहिवळे,बबलू जगताप,चंद्रकांत भोसले,सोमनाथ रणदिवे,नितीन सोनवणे,सचिन जगताप,संजय सोनवणे,अक्षय मेमाणे यांनी आयोजन केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा