Breaking News

१० ऑक्टोबर २०२३

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सोमनाथ खंडागळे यांची बिनविरोध निवड...


 अजनाळे:सचिन धांडोरे: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सोमनाथ खंडागळे तर उपाध्यक्षपदी सीमा चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर शाल श्रीफळ हार फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

काल मंगळवार दि १० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पालक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजय येलपले होते. यावेळी व्यासपीठावर विठ्ठल कोळवले, पत्रकार सचिन धांडोरे, ग्रामपंचायत सदस्य महादेव भंडगे, चंद्रकांत पवार, मुख्याध्यापक बाळासाहेब ऐवळे, एकनाथ गुरव, दाजी शेंबडे,डॉ अशोक कलाल यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने.

सोमनाथ खंडागळे यांचा  एकमेव अर्ज असल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी समाधान मंडले,ज्ञानदेव चव्हाण, सुनील धांडोरे, प्रदीप गेजगे,अमन केंगार, चिमण केंगार, नामदेव देशमुख, दीपक भंडगे, पांडुरंग चव्हाण, गोपाळ लांडगे, सचिन जाधव, लक्ष्मण येलपले, विजय धांडोरे, दत्तात्रय शेंबडे, राजू कोळवले, नंदकुमार कोळवले, छाया भंडगे, मनीषा भंडगे, काजल केंगार, सुरेखा मंडले, सोनाली भंडगे, ऋतुजा भंडगे, प्रियंका शेंबडे, मनीषा भुसनर, अर्चना चव्हाण, मनीषा हेगडे, सोनाली येड्रावकर यांच्यासह अन्य पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एकनाथ गुरव गुरुजी यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा