Breaking News

67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नऊदारे येथे धम्म ज्योत रॅलीचे आयोजन..


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

जंक्शन :- ( ता. इंदापूर ) सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त  "धम्मज्योत" रॅली चे "आयोजन धम्मगुरु डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुद्धविहार व्यवस्थापन समिती व राहुल तरुण मित्र मंडळ नऊदारे यांचे वतीने करण्यात आले होते.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान वालचंदनगर  येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदना घेऊन  "धम्मज्योत"प्रज्योलीत करण्यात आली ती नऊदारे येथिल बुद्धविहारा पर्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने या धम्मज्योत मोटारसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते . तसेच  नऊदारे येथिल बुद्धविहारामध्ये सामुदायिक बुद्धवंदनेचा कार्यक्रम घेऊन हा कार्यक्रम संपन्न झाला.

  नऊदारे येथिल शेकडो युवक अनुयायांनी या धम्मज्योत रॅलीमध्ये भाग घेतला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत