चांडाळ चौकटीच्या करामती फेम ह.भ.प भरत शिंदे (बाळासाहेब)यांचे अजनाळे येथे उद्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन.
अजनाळे:सचिन धांडोरे: स्वर्गीय आ डॉ गणपतरावजी देशमुख यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त उद्या गुरुवार दि १० आँगस्ट रोजी साय ६ वा चांडाळ चौकटीच्या करामती फेम ह.भ.प भरत शिंदे (बाळासाहेब) यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित केले असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
या कार्यक्रमासाठी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख व डॉ अनिकेत देशमुख यांच्यासह आजी माजी जि प सदस्य विविध संस्थेचे चेअरमण,व्हा चेअरमन ,सरपंच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहान शेतकरी कामगार पक्ष अजनाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत