जागतिक मैत्री दिन भिगवणमध्ये महिलांकडून जल्लोषात साजरा..
विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
भिगवण :- ( ता. इंदापूर )आज जागतिक मैत्री दिनाचं औचित्य साधून सौ. मेघाताई शेलार यांच्या बाईपण भारी या ग्रुपच्या वतीने मैत्री दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी तरुणाईला ही लाजवेल असा प्रत्येक महिलेचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.आजच्या या धावपळीच्या युगात महिला चक्क बाहेर पडत आहे ,स्वतःसाठी वेळ काढत आहेत आणि आयुष्याचा आनंद घेत आहेत .
एका साध्या गृहिणी पासून ते नोकरदार महिला यांचा सहभाग असणं हेच या ग्रुपचे वैशिष्ठ्य,..!
यावेळी संगीता नवले,भाग्यश्री कानतोडे,कोमल सोनवणे,साधना रानवडे ,निर्मला कुसाळकर,वैशाली दाते,सीमा काळंगे, पुजा दळवी,रेश्मा मुलाणी,प्रेमिका सोनवणे,अश्विनी थोरात,गौरी पवार,लता माने,अस्मिता क्षीरसागर,शीला चोपडे या सर्व महिलांचा सहभाग होता.तसेच भिगवण ग्रामपंचायतीच्या आदरणीय सरपंच सौ . दीपिका तुषार क्षीरसागर यां ही वेळ काढून या ठिकाणी आवर्जून उपस्थित होत्या.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मेघाताई म्हणाल्या की, स्त्रीमुक्ती,स्त्री स्वातंत्र्य ,महिला सबलीकरण या आणि अशा बऱ्याच गोष्टी खऱ्या अर्थानं तेव्हाच घडतील ,जेव्हा प्रत्येक स्त्री स्वतःहून स्वतःलाच वेळ देईल, काळ आणि वेळेबरोबर असेल.
भिगवण मधील रेहान (पापाभाई)तांबोळी यांच्या ऐश्वर्या बेकरी मध्ये या मैत्रीदिनाचा हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत