श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे कलाशिक्षक अतुल गायकवाड सर आर के बहुउद्देशीय संस्था पुणे "2023 महाराष्ट्र कला गौरव " पुरस्काराने सन्मानित
विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
वालचंदनगर :- (ता. इंदापूर ) कै.मुक्ताबाई गोरे यांच्या स्मरणार्थ ; शैक्षणिक ,सामाजिक, सांस्कृतिक, योगदानाबद्दल दिला जाणारा आर. के बहुउद्देशीय संस्था, पुणे यांचे तर्फे यावर्षीचा दिला जाणारा 2023 "महाराष्ट्र कलागौरव पुरस्कार" यावेळी श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर येथील कलारत्न ,कलाशिक्षक मा. अतुल अभिमन्यु गायकवाड सर यांना प्रदान करण्यात आला .
यावेळी इंदापूर तालुक्याचे आमदार , मा. दत्तात्रय भरणे मामा , युनिट हेड ऑफ वालचंद इंडस्ट्रीज लिमिटेड , वालचंदनगर तसेच आर . के बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा.आनंदजी साळुंके सर आणि उपाध्यक्ष भाग्यश्री ताई साळुंके, महिला सुरक्षा आयोग अध्यक्ष , पुणे महाराष्ट्र राज्य समुपदेशक, बाल शोषण ,महिला सबलीकरण समुपदेशक यांचे शुभहस्ते अतुल गायकवाड सरांना सन्मानित करण्यात आले.
तसेच आदर्श शिक्षिका पुरस्कार विद्यालयातील विज्ञान शिक्षिका नलिनी अतुल गायकवाड मॅडम ,अरुंधती सुहास अंबिके मॅडम आणि भारत चिल्ड्रन्स अकॅडमी च्या सुरवसे मॅडम यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी अतुल गायकवाड सरांनी त्यांच्या कुंचल्यातून रेखाटलेले मा.भरणे मामांच्या मुलाचे श्रीराज दत्तात्रय भरणे यांचे व्यक्तिचित्र मामांना भेट दिले ,तसेच आर. के बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा.साळुंके सर यांचेही व्यक्तिचित्र त्यांना भेट दिले.
यावेळी युनिट हेड ऑफ WIL,वालचंदनगर मा. धीरज केसकर सर ,शाळा समिती अध्यक्ष मकरंद वाघ सर ,उपाध्यक्ष प्रशांत महामुनी सर ,शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत कुंभार सर ,भारत चिल्ड्रन्स अकॅडमी चे मुख्याध्यापक क्षीरसागर सर,उपमुख्याध्यापक अरुण निकम सर ,कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य नाकाडे सर ,पर्यवेक्षक हिरवे सर ,पर्यवेक्षिका आश्र्विंदर घुले मॅडम ,तसेच प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका वाघमारे मॅडम ,बाबर मॅडम आणि सर्व वालचंदनगर मधील शाळेतील शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यावेळीउपस्थित होते .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत