Breaking News

कौतुकास्पद उपक्रम : पुणे पोलिस व आर.के.बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सर्व महानगर पालिकेतील शाळांमध्ये समुपदेशन


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

पुणे :- आर. के. बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचप्रमाणे पुणे पोलीस आणि आर. के. बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सर्व महानगरपालिकेतील शाळांमध्ये समुपदेशन चालू केलेले आहे.

 आज जी मुले सोशल मीडियामुळे प्रवाहाच्या बाहेर जात आहेत,  व्यसनाधीनता वाढलेली आहे, त्यांचे अभ्यासातील लक्ष कमी झालेले आहे,  त्यासाठी संस्थेच्या वतीने त्यांना परत प्रवाहात आणण्यासाठी पुणे पोलीस आणि आर. के. बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने  "युवा विचार परिवर्तन" हा उपक्रम चालू केलेला आहे.

     आज आर. के. बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कर्मवीर भाऊराव हिरे  हायस्कूल या शैक्षणिक संस्थेमध्ये समुपदेशन आणि त्या शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला.

  या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, शाळेचे मुख्याध्यापक अजित माने, संस्थेचे अध्यक्ष आनंद साळुंके, भाग्यश्री साळुंके, प्रणव साळुंके, त्याशिवाय सामाजिक कार्यकर्ते समीर वासवंत आणि योगेश बेलदरे आदी मान्यवर उपस्थित होते.               या कार्यक्रमांमध्ये अरविंद चावरिया सरांनी अतिशय सोप्या आणि छान भाषेत मुलांशी संवाद साधला. आणि मुलांना खूप छान समुपदेशन ही केले. त्यामध्ये त्यांनी सांगितले की , आपण अभ्यास करून आपलं आयुष्य बदलण्यासाठी कसे प्रयत्न करावेत आणि आपली जिद्द कशी वाढवावी, आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी कसे प्रयत्न करावेत आणि त्या दृष्टीने आपण अभ्यास कसा करावा याविषयी अतिशय सुंदर  मार्गदर्शन सरांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र शिंदे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार  हिरे स्कूलचे महादेव चौधर यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत