Breaking News

तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये विकास विद्यालय अजनाळेचा मोठ्या गटात द्वितीय क्रमांक..

 

अजनाळे: सचिन धांडोरे:  रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये मोठ्या गटात विकास विद्यालय अजनाळे या  विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवुन घवघवीत यश संपादन केले आहे. प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.  त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद (दादा) येलपले, मुख्याध्यापिका सिंधू कोळवले ,माजी  प्राचार्य शामराव कोळवले यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस  विद्यार्थ्यांना हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत