Breaking News

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लासुर्णे येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.                      

  लासुर्णे :- ( ता. इंदापूर) १५ आॕगस्ट रोजी जि.प.शाळा लासुर्णे येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभी ध्वजारोहण मेजर मंगेश सवाने यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर प्रभातफेरी सैनिक यांची वेशभुषा करून हातात तिरंगी ध्वज घेऊन विविध संदेश देणारे स्लोगन पताका घेऊन वाद्यांच्या गजरात देशभक्तीपर घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली. 

 त्यानंतर इनफोसिस कंपनीतर्फे व कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान अंतर्गत दिलेल्या संंगणक कक्षाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक सावंत यांचे हस्ते झाले.यानंतर मंथन व प्रज्ञाशोध परीक्षा यामध्ये प्राविण्य मिळवेलेल्या विद्यार्थी यांचा सत्कार पेन व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी शाळेसाठी मदत करणारे ग्रामस्थ  व शिक्षकवृंद शाळा लासुर्णे यांचाही  सत्कार शाळा व्यवस्थापन समिती लासुर्णे यांनी पेन व पुष्पगुच्छ देऊन केला.

यावेळी विद्यार्थी भाषणे व ग्रामस्थामधुन निखिल भोसले यांनीआपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी ग्रामपंचायत लासुर्णे मार्फत मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. 

या कार्यक्रमाला अतिथी म्हणून दिपक सावंत अध्यक्ष , रामचंद्र दगडे उपाध्यक्ष ,निखिल भोसले ग्रामपंचायत सदस्य ,रूपाली माळवदे रा.स.प.अध्यक्षा इंदापूर  राजेश गांधी समय किराणा स्टोअर्स ,नरेंद्र लोदाडे,नानासो. गुरव सर,भिमराव भोसले ,अनिल गणगे,प्रणिता फोटो स्टुडिओ लासुर्णे  सचिन चव्हाण , समीर बोरावके,राहुल जळक,भारत भोसले,मच्छिंद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद अंगणवाडी सेविका यांनी केले. रांगोळी दिपाली घाडगे यांनी उत्कृष्ट काढली. कार्यक्रमाचे सूञसंचालन गणेश शिंदे सर व आभार राजेंद्र शिंदे सर यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत