आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउददेशीय संस्थेतर्फे वृक्षारोपण संपन्न
विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
भिगवन :- ( ता. इंदापूर ) आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशिय संस्थेच्या तर्फे दि.१४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिगवण येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला, संस्थेच्या इंदापुर तालुका महीला अध्यक्षा मेघना सुनिल शेलार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पर्यावरणाचा -हास, ग्लोबल वॉर्मिंग यामुळे वृक्षारोपण करून त्यांचं संवर्धन आणि संगोपन करणे ही काळाची गरज आहे. हे लक्षात ठेवूनच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवा तांबे सर यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रेरणेतूनच ही संकल्पना मिळाली.'मिशन ऑफ से व्हींग अर्थ' आणि 'नैसर्गिक ऑक्सीजन निर्मिती हीच वृक्षारोपणाची प्रमुख वैशिष्ट्ये असे प्रतिपादन यावेळी मेघाताई यांनी केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष सरपंच दिपिका ताई क्षीरसागर तर प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवा तांबे सर आणि माजी आदर्श सरपंच हेमाताई माडगे यांची उपस्थिती लाभली होती . तसेच उपसरपंच मुमताज शेख, छायाताई पांचांगणे, रोटरी क्लब अध्यक्ष दिपाली भोंगळे, रेखा खाडे, निलिमा बोगावत संपूर्णा जाधव, सीमा काळंगे, निर्मला कुसाळकर, कमल दाते, रेश्मा मुलानी,
सोनाली वाकसे, आशा गायकवाड, सुवर्णा भोसले ,सविता पवार,
मीना येवले, शुभांगी सुळके, संगिता नवले, राणी ढमढेरे ,साधना शिंदे, सुरेखा सवाणे, कविता सुळके ,अश्वीनी थोरात, साठे बाई, प्रेमिका सोनवणे ,स्वाती तांदळे, अंबिका साखरे ,सरिता चौधरी , वैशाली थोरात, आरती कोल्हे, वैशाली चाटे, प्रियंका शेलार, तसेच नंदिनी भोसले , धनश्री गुरव, मंदा उंडाळे अंगणवाडी शिक्षिका या महिलांची लक्षणिय उपस्थिती होती. यावेळी आदर्श सर्पमित्र पुरस्कार गौतम शेलार यांना संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे सर यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आला.
भिगवण ग्रामपंचायतीतील सर्व पदाधिकारी, परागभाऊ जाधव प्रा. तुषार क्षीरसागर, सचिनभाऊ बोगावत जावेदभाई शेख, दत्ता वाघ, गुराप्पा पवार, दत्ता धवडे, दत्ता लोंढे, अशोक
येवले ,रणजित जाधव , शाळा व्यवस्थापन समितीचे शहाजी गाडे ,राजाभाऊ हगारे, शौकत पठाण, सत्यवान भोसले, जब्बार शेख यांची, उपस्थिती होती. तसेच तरुणवर्ग प्रमुख सौरभ जमदाडे ,निखिल शिंदे ,डॉ. प्रणित नाचण, डॉ अनिकेत
होले, श्रीराम चिपाडे, अजित जगताप, बाबू पुजारी आणि ब्रम्हदेव कोल्हे आदी उपस्थित होते.
रोप संयोजन ब्रम्हदेव कोल्हे यांचं अनमोल सहकार्य लाभले.
जि. प. प्रा.शाळेच्या मुख्याध्यापिका कानडे मॅडम यांच निरपेक्ष सहकार्य जयश्री सरके - मारकड मॅडम आणि सचिन गायकवाड सर यांचे उत्कृष्ट सुत्रसंचालन याने कार्यक्रमाची शोभा वाढविली. मेघाताई शेलार यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि ग्रामस्थ महिलांचे,सर्व शिक्षक वृंद,शाळा व्यवस्थापन समितीचे आभार मानले. भविष्यातही ठिकठिकाणी वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न नक्कीच असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत