Breaking News

श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रथमच इयत्ता नववी आणि दहावीसाठी " Student Ability Test " ही " CET " परीक्षा, नाविन्यपूर्ण उपक्रम नलिनी गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शन, नियोजनातून सुरू..


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

  वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर येथे प्रथमच इयत्ता नववी आणि दहावी साठी "Student Ability Test" ही "CET" परीक्षा आज दिनांक .4जुलै 2023 पासून सुरू करण्यात आली आहे .

सदर परीक्षा ही दर महिन्यातून किमान 2 वेळेस घेतली जाणार आहे .

झालेल्या अभ्यासक्रमावर science , maths आणि जनरल  अपडेट्स यावर ही परीक्षा आधारित असणार आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातील विद्यार्थी आणि पालक वर्ग खूप उत्सुक होते . आणि या परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात मुले अभ्यासाला लागलीत ,आनंदाने जास्त मेहनत करू लागले आहेत. 

सदर परीक्षा  ही विद्यार्थ्यांच्या पुढील आव्हानात्मक परीक्षांसाठी (JEE /CET/NEET)पूर्वतयारी आहे.

या परीक्षेचे पूर्ण नियोजन  नलिनी  गायकवाड   मॅडम  विज्ञान व गणित शिक्षिका यांनी केले आहे .तसेच पूर्ण प्रश्नपत्रिका ही 15 दिवसांच्या अभ्यासक्रमावर असून या परीक्षेचे पेपर स्वतः नलिनी मॅडम काढणार आहेत व त्यांच्या पालकांपर्यंत परीक्षेमध्ये त्यांच्या पाल्यांना किती गुण मिळाले  हे मीटिंग घेऊन सांगणार आहेत .

सदर परीक्षे संदर्भातील सर्व प्रश्न हे MCQ टाईप असणार आहेत.त्यामुळे मुलांचा रट्टा मारणे कमी होईल आणि शिकवलेल्या अभ्यासक्रमाचे वाचन करून विद्यार्थी परीक्षा देतील यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांचे अभ्याससातत्य टिकून राहण्यास मदत होईल.


या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी स्वतः विद्यालयाचे अध्यक्ष  मा.मकरंद वाघ सर तसेच प्राचार्य  कुंभार सर , कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य नाकाडे सर ,उपमुख्याध्यापक  निकम सर , परीवेक्षक  हिरवे सर ,पर्यवेक्षिका घुले मॅडम उपस्थित होते.

 

  यावेळी मा . अध्यक्ष यांनीआपले मनोगत व्यक्त केले . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले सध्याच्या काळात जर इयत्ता .नववी पासूनच अशी सुरुवात झाली तर पुढे मुलांना स्पर्धा परीक्षा अजिबात अवघड जाणार नाही . मुलांचे मनोबल ,धैर्य वाढीस लागेलं आणि जिद्दीने, चिकाटीने वर्धमान विद्यालयातील विदयार्थी पुढील आव्हानात्मक परीक्षा देतील यात काही शंका नाही.

  

यावेळी सर्व पदाधिकारी यांनी विदयार्थी आणि नलिनी मॅडम यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

नलिनी मॅडम यांची विद्यार्थ्यांसाठीची  ही धडपड नक्कीच विद्यालयाला आणि विद्यार्थ्यांना यशाचे शिखर मिळवून देणार हे नक्की . 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत